Gayran Atikraman | गायरान जमीन अतिक्रमण हटवा मोहिमेस तात्पुरती स्थगिती

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो राज्यात सध्या सुरू असलेली शासकीय जमीन गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक आदेश जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे. मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतलं होते कि कोर्टाच्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2022 पूर्वी राज्यातील गायराने शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते. 

परंतु याच्या विरोधात बऱ्याच साऱ्या याचिका दाखल करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारच्या अर्ज दाखल करण्यात आलेले होते. याच  अर्जावर सुनावणी करत असताना कोर्टाच्या माध्यमातून या याचिकाकर्त्यांना आपले या जमिनीवरचे अधिकार सिद्ध करण्यासाठी काही वेळ देण्यात आलेला आहे.  या पार्श्‍वभूमीवर राज्याचे सरकारी वकील पी.पी.काकडे यांच्या माध्यमातून सचिव ग्रामविकास विभाग सचिन महसूल विभाग यांना पत्र लिहून 8 डिसेंबर 2022 रोजी अशाप्रकारे कळवण्यात आलेले आहे. 

या पार्श्वभूमीवर आता ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आलेले आहे.  याच अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या माध्यमातून हे पत्रक काढून या गायरान आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहिमेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं कळवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये पुढील निकाल येईपर्यंत ही सुरू असलेले अतिक्रमण निष्ठा सणाचे मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात यावी. अशा प्रकारच्या आदेश सूचना त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. 

मित्रांनो अशा प्रकारे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या माध्यमातून सूचना देण्यात आलेले आहेत. हळूहळू सर्व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ही निष्ठा सणाचे मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात येईल आणि हे जे अतिक्रमण धारक आहेत,त्यांना आपला आपल्या जागेवरील अधिकार सिद्ध करण्यासाठी वेळ दिला जाईल. याप्रमाणे दोन आठवड्यांच्या आत मध्ये राज्य सरकारला सुद्धा या  अतिक्रमणाच्या निष्ठासणाबाबत त्याप्रमाणे पुढील अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रोड मॅप सादर करण्यासाठी ची माहिती देण्यात आले तसेच निर्देश देण्यात आले आहे. तर ते देखील सरकारच्या माध्यमातून सादर केलं जाईल.  याच पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये कोर्टाचा जो निकाल  येईल. त्या पार्श्वभूमीवरती पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Leave a Comment