Juni Vihir Durusti Yojana | शेतकऱ्यांना जुन्या विहिरीच्या दुरुस्ती साठी मिळणार 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..!

Juni Vihir Durusti Yojana : नमस्कार मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी तब्बल 50 हजार रुपये अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.  तसेच आपण या साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि त्याच्या अटी सुद्धा जाणून घेणार आहोत.  मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती हि कळून जाईल. 

मित्रांनो शेती करायचा म्हटलं तर पाणी हवं. तसेच शेतीच्या सिंचनासाठी विहीर  ही खूप महत्त्वाची आहे.  त्याशिवाय शेतीचा विचारही करता येत नाही. मित्रांनो शेतात विहीर किंवा बोर असणे खूप गरजेचे आहे, त्यासाठी राज्य सरकार मार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शासनाकडून आता अशीच एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. 

 अनेक शेतकऱ्यांना आपल्या जुन्या विहिरी ची दुरुस्ती करता येत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना जुन्या विहिरी ची दुरुस्ती करता यावी यासाठी शासनाकडून खास योजना राबवली जात आहे. या योजनेचे नाव आहे  “डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना”.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकार कडून 50 हजार रुपयांची मदत मिळते.  फास्ट

मित्रांनो महाडीबीटी फॉर्मर योजना या पोर्टल वर याठिकाणी लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी नेमके आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे पण महत्त्वाचे आहे. 

आवश्यक कागदपत्रे 

  • सात-बारा व आठ-अ उतारा
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • सक्षम प्राधिकारी कडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
  • लाभार्थी दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
  • विहीर असलेल्या जमिनीचा सर्वे गट नंबर नकाशा व चतुरसीमा
  • विहिरीत पाणी असल्याचा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने चा दाखला
  • कृषी अधिकाऱ्यांची क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र
  • गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस पत्र व जागेचा फोटो

 योजनेसाठीच्या अटी

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ अनुसूचित, एससी जात प्रवर्गातील शेतकऱ्यांनाच मिळतो. 
  • योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक ते दीड लाखापर्यंत. 
  • जमिनीचा 7 12 व आठ-अ उतारा तसेच उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे किमान अर्धा एकर ते सहा हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक.  

Leave a Comment