Mini Tractor Anudn | या जिल्ह्याचे मिनी ट्रॅक्टर सह गटई स्टॉलचे अर्ज सुरू

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बांधवान करता विविध योजना राबवल्या जातात आणि यांच्यामधील अनुदानावर मिनी ट्रॅक्टर याचप्रमाणे गटई स्टॉल वाटप या योजनेच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील दोन महत्त्वपूर्ण अशे अपडेटआहेत. लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सोसाहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर साठी अर्ज सुरू झालेले आहेत. जे अर्ज 15 जानेवारी 2023  पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. 

हे पण वाचा : Relief For Children | प्रलंबित 50 हजार रुपये अनुदान येणार खात्यात

मित्रांनो याच्यासाठी असणाऱ्या अटी शर्ती अनुदाना बद्दल यापूर्वीसुद्धा पण माहिती घेतलेली आहे.  त्याच्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या जे स्वसाहाय्यता बचत गट आहे. त्याच्यामध्ये 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असतील. अशा बचत गटांना 90 टक्के अनुदानावर ती अर्थात 3 लाख 15 हजार रुपयांपर्यंत अनुदान या मिनी ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी दिले जात. 

ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांना 9 पासून 18 अश्वशक्ती पर्यंत ट्रॅक्टर खरेदी करता येतो. याच्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख 15 हजार रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिले जातात.  त्याच्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर 50 टक्के आणि आरटीओकडे नोंदणी झाल्यानंतर उर्वरित 50 टक्के अशा प्रकारांमध्ये अनुदान दिले जातात,आणि याच्या पेक्षा जास्त जर खरेदी करायची असेल तर उर्वरित जो काही खर्च असेल तो त्या ठिकाणी लाभार्थ्यांना स्वतः करायचा असतो. 

हे पण वाचा : PMAY | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2022 की तिचा पहिला हप्ता वितरित

मित्रानो याच्यासाठी 15 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याचप्रमाणे अनुसूचित जातीतील गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर ती गटई स्टॉल साठी सुद्धा अर्ज स्वीकारले जात आहेत. याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2023 आहे. लातूर जिल्ह्यातील जे काही गटई कामगार असतील,अशा गटई  कामगारांना हा अर्ज करता येणार आहे. यांच्यासाठी अर्जदाराचा ग्रामीण भागासाठी उत्पन्नही 40 हजार रुपये तर शहरी भागासाठी उत्पन्न 50 हजार रुपये असाव. 

याच्यासाठी गटई स्टॉल लावण्याच्या जागेचा आठ अ उतारा किंवा भाडे करार पत्र शंभर रुपयाच्या बॉण्डपेपर वरती विहित नमुन्यातील करारनामा. अशा प्रकारच्या काही महत्त्वपूर्ण अशा कागदपत्रासह आपल्याला हा आर्ज 5 जानेवारी 2023 पर्यंत आणि ट्रॅक्टरच्या अनुदान न करता 15 जानेवारी 2023 पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय मध्ये जमा करायचे आहे. आपण जर या प्रवर्गातील असाल आपण जर या योजनेसाठी पात्र असाल तर आपण या योजनेकरिता अर्ज करू शकता. 

हे पण वाचा : Juni Vihir Durusti Yojana | शेतकऱ्यांना जुन्या विहिरीच्या दुरुस्ती साठी मिळणार 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या ‘या’ योजनेबाबत जाणून घ्या..!

मित्रानो हि योजना साधारणपणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाते आणि प्रत्येक जिल्ह्याच्या माध्यमातून एक तारीख निश्चित करून अर्ज मागवले जातात. त्यांच्या मधील आताही लातूर जिल्ह्यात करता अर्ज मागवण्यात आले आहेत. तर इतर ज्यांच्या जिल्ह्याच्या अर्ज मागवले जातील किंवा त्याचे जे जे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होती त्याच्या बद्दलची माहिती सुद्धा आपण येणारे लेखाच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Leave a Comment