Nuksan Bharpai | आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ केली आहे. तर हि संपूर्ण माहिती आपण आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा : Gayran Atikraman | गायरान जमीन अतिक्रमण हटवा मोहिमेस तात्पुरती स्थगिती

मित्रांनो राज्यातील शिंदे-फडणीस सरकार शेतकऱ्यांसाठी धावून आलेली आहे. राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना मदत म्हणून देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टर दुप्पट करण्यात आली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल व वन विभागाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.

 किती भरपाई मिळणार…. ?

जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 6800 रुपयांऐवजी, आता 13,600 रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13,500 रुपयांऐवजी आता 27 हजार रुपये भरपाई मिळणार आहे. हा निर्णय महसूल व वन विभागाने जाहीर केला आहे. 

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18000 ऐवजी 36000 रुपये भरपाई मिळेल. तसेच, राज्य सरकारने नुकसानीची मर्यादा ही वाढवली आहे. ता दोन ऐवजी तीन हेक्‍टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणमागण्या मागण्यांद्वारे या निधीची तरतूद करण्यात येईल.  त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्त किंवा शासन आदेशाप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. 

हे पण वाचा : Pik Vima | पीक नुकसानीच्या जलद भरपाईसाठी केंद्राचे पाऊल

या नुकसानीसाठी आता शेतकऱ्यांना वाढीव रक्कम देण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment