Pikvima | तात्काळ नुकसान भरपाईसाठी शासनाचे महत्त्वाचे पाऊल

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो राज्यांमध्ये वेळोवेळी विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे शेतीचा पशुधनाचा किंवा घरांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा परिस्थितीमध्ये या नुकसान ग्रस्त झालेल्या बाधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असतं. हेच नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी तात्काळ मिळवून देण्यासाठी आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. 

मित्रांनो आपण जर पाहिले तर राज्यामध्ये चक्रीवादळ असेल पूर परिस्थिती असेल किंवा अतिवृष्टी असेल गारपीट असेल अशा प्रकारचे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे शेतीचा पशुधनाचा  किंवा घरांचे नुकसान होतं. परंतु अशा प्रकारचे नुकसान झाल्यानंतर त्या ठिकाणी पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना ते आपत्तीग्रस्तांना मदत मिळते. 

बऱ्याच वेळा त्या भागांमध्ये पूर परिस्थिती असल्यामुळे पंचनामे करता येत नाही त्याच्यामुळे दिरंगाई होते किंवा दिलेला डाटा त्याठिकाणी वस्तुनिष्ठ नसतो त्याच्या मधे सुद्धा सदोष डाटा आढळून येतो. शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या असेल तर त्याच्या मधे सुद्धा बऱ्याच वेळा चुकीचा डाटा दिला जातो. 

नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकर्‍यांचे नुकसान अधिक असता त्याला नुकसान भरपाई कामी मिळते किंवा नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी खूप दिरंगाई होते. अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी राज्यांमधील उद्भवलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून याच्या वरती काहीतरी उपाययोजना करण्याचा 2021 मध्ये निश्चित करण्यात आलेला होत. तशा प्रकारचं सूतोवाच तत्कालीन कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या माध्यमातून सांगण्यात देखील आले होते. मित्रानो याच पार्श्वभूमीवरती 13 डिसेंबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. 

शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता 

येथे क्लिक करा

तर संचालक आपत्ती व्यवस्थापन हे या ठिकाणी सदस्य सचिव असणार आहेत आणि या समितीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या प्रस्तावाचे व्यवहार्यता तपासली जाईल. या ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या सर्वे असतील किंवा सॅटेलाईट इमेज या माध्यमातून आलेल्या डाटा असेल. हा किती अचूक आहे तो किती वस्तुनिष्ठ हे त्यांच्या माध्यमातून तपासले जाईल.  अशा प्रकारची  व्यवहारता तपासल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये नुकसान भरपाई झाल्यानंतर जेके पंचनामे केले जातात हे व्यक्तीच्या पंचांनी न करता अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जातील. लवकरात लवकर हे पंचनामे करून या आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी या माध्यमातून मदत मिळणार आहे.  

मात्र मित्रांनो आपण जर पाहिले तर सॅटॅलाइट इमेज च्या माध्यमातून आलेल्या डाटा किंवा ड्रोनच्या माध्यमातून केलेले सर्वे याच्यामधून अचूक पिकांच्या नुकसानीच्या किती डाटा मिळेल हे सुद्धा या ठिकाणी  प्रश्नचिन्ह आहे.  याच्यामुळे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा या पंचनाम यांना किंवा या प्रक्रियेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो. मात्र सध्या तरी या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी किंवा अतिवृष्टी चे नुकसान भरपाई तात्काळ मिळवून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे काम अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. 

अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता याची माहिती आपण या  लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment