Pipe Line Anudan Yojana : पाईपलाईन अनुदान योजना सुरू | असा करा अर्ज ?

PVC Pipe Line Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो,  मित्रांनो शासन हे शेतकऱ्यांसाठी  अनेक योजना आणत आहे. आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की पाईपलाईन अनुदान योजनेबद्दल. मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. 

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नवीन पाईपलाईन करायचे असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र सरकार या नवीन पाईपलाईन करण्यासाठी आता सबसिडी देत आहे. तुमच्या शेतामध्ये जर सिंचन स्रोत उपलब्ध नसेल आणि तुमच्या शेताजवळ तळे तलाव नदी आहे तर तुम्ही तिथून तुमच्या शेतापर्यंत काय करू शकता. यासोबत तुम्हाला महाराष्ट्र सरकार सुद्धा देत आहे. 

मित्रांनो पाईप लाईन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य योजने साठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. मित्रांनो पाईपलाईन शेतीमध्ये अंथरण्यासाठी खूप खर्च येतो. यासाठी शासनाने पाईपलाईन खरेदीवर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचे जाहीर केले आहे. कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना  पाईपलाईन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळते. 

नवीन पाईप लाईन योजनेसाठी आपल्याला महाराष्ट्र सरकार 50% किंवा पंधरा हजार रुपये इतके अनुदान देत आहे. यामध्ये आपल्याला पीव्हीसी पाईप खरेदीकरिता करण्यासाठी अनुदान देत आहे.

 पाईप लाईन खरेदी साठी अर्ज कसा करावा ? 

तुम्हाला जर नवीन पाईपलाईन करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता व नवीन पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता.  पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदी “Maha-Dbt”  पोर्टल वर जाऊन फॉर्म लॉग इन करून स्वतःचे प्रोफाइल तयार करावी.  त्यानंतर कृषी सिंचन योजना अंतर्गत हे ऑप्शन निवडावे  त्यानंतर त्यामध्ये पाईप लाईन चा प्रकार पाईपलाईन ची लांबी काय आहे ते टाकावे आणि अर्ज करावा. 

मित्रानो तसेच तुम्ही तुमच्या जवळील महा-ई -सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र ला भेट द्या व तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करून घ्या.   

 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे)
  •  ई-मेल आयडी
  •  बँक पासबुक
  • 7/12 उतारा 
  • 8/अ उतारा 

Leave a Comment