PMAY | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2022 की तिचा पहिला हप्ता वितरित

नमस्कार मित्रांनो,मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या संदर्भातील एका अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय १५  डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून २०२२ – २३ या वर्षाकरता या योजनेकरिता पहिल्या हप्त्याच्या वितरना पोटी 816 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

हे पण वाचा : Nuksan Bharpai | आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

मित्रांनो राज्यात घरकुलाची कामा तात्काळ व्हावेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा पात्र झालेल्या लाभार्थ्यांचे त्यांच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण व्हावं. याप्रमाणे घरकुलासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाची जागा उपलब्ध करून द्यावी. यासाठी अमृतमहावास अभियान राबवला जात आहे. याचा अभियानाच्या अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी जलदगतीने करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मित्रांनो आज  पार्श्वभूमीवरती १५  डिसेंबर २०२२  रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजना करता २०२२-२३ करता पहिल्या हप्त्याचा निधी म्हणून 816 कोटी रुपये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाकडून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये सन २०२०- २१ २०२१-२२  या वर्षासाठीच्या उद्दिष्ट करता केंद्रशासनाच्या हिश्याचा पहिल्या हप्त्याचा 490 कोटी 4  लाख रुपये तर राज्य शासनाचा हिस्सा 326 कोटी 69 लाख 33 हजार 300  रुपये असा एकूण 816 कोटी 73 लाख 33 हजार 300 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

हे पण वाचा : Gayran Atikraman | गायरान जमीन अतिक्रमण हटवा मोहिमेस तात्पुरती स्थगिती

मित्रांनो या निधीचे वितरणामुळे लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण दुसऱ्या हप्त्याचे वितरण त्याचबरोबर या निधीच्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या लाभार्थ्यांना लक्षकानुसार नवीन घरकुलाची मंजुरी अशा प्रकारची कामं पार पाडले जाऊ शकतात. अशा प्रकारच्या अमृतमहावास अभियानाच्या अंतर्गत निधी उपलब्ध झाल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुलाचे काम किंवा जास्तीत जास्त पात्र झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलच्या हप्त्याचे वितरण त्याचे वितरण केले जाणार आहे. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण mharashtra.gov.in या संकेत स्थळाचे पाहू शकता.

Leave a Comment