Relief For Children | प्रलंबित 50 हजार रुपये अनुदान येणार खात्यात

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो 15 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून  कोरोनामुळे मयत पावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या 50000 रुपयाच्या प्रलंबित अनुदान. याचबरोबर या  कोरणाच्या महामारी मुळे आई वडील किंवा आई किंवा वडील अश्या पालक गमावलेल्या मुलांच्या नावावर ती केल्या जाणाऱ्या पाच लाख रुपयाचे फिक्स डिपॉझिट साठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

हे पण वाचा : PMAY | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2022 की तिचा पहिला हप्ता वितरित

मित्रांनो यांच्या संदर्भातील पहिला शासन निर्णय आपण पाहू शकता ज्या शासन निर्णयच्या  माध्यमातून कोव्हीड नाईंटीन या आजारामुळे मयत पावलेल्या व्यक्तीच्या नजदीकीच्या नातेवाईकाला दिल्या जाणाऱ्या 50 हजार रुपयांचे अनुदान. या अनुदानासाठी राज्यातील पात्र झालेल्या 2000 अर्जदारांना प्रत्येकी 50 हजार रुपये असे अनुदान वितरित करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

मित्रांनो आपण जर पहिल तर बऱ्याच दिवसापासून आधार कार्ड मध्ये दुरुस्ती किंवा हे पोर्टल बंद असल्यामुळे  लाभार्थ्यांना होणारा अनुदानाचे वितरण,या सर्वांमध्ये व्यत्यय निर्माण झालेला होता.  या पार्श्वभूमीवर ती आता हा शासन निर्णय घेऊन या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना 2000 लाभार्थ्यांना या पन्नास हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्याकरता आज 10  कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आले आहे.  

हे पण वाचा : Nuksan Bharpai | आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

योजनेचा उद्देश

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना संसर्ग किंवा इतर कारणांमुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे पुनर्वसन करणे व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्य करणे.

योजनेचे लाभार्थी 

त्याचबरोबर 17 जून 2021 रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्यांमध्ये एक योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. ज्याच्यामध्ये पीएम केअर्स फोर चिल्ड्रन  या योजनेच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून,

  • दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर कोरोना संसर्गामुळे ज्या बालकाचे दोन्ही पालक मृत्यू पावलेले आहेत अशी 0 ते 18 वयोगटातील बालके. 
  • दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर एका पालकाचा covid-19 मुळे तर एका पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास त्यांची 0 ते 18 वयोगटातील बालके. 
  • दिनांक 1 मार्च 2020 पूर्वी एका पालकाचा मृत्यू झाला असेल व दिनांक एक मार्च 2020 किंवा त्यानंतर एका पालकाचा कोविड मुळे मृत्यू झाला असल्यास त्यांची 0 ते 18 वयोगटातील बालके. 

अशा बालकांच्या नावे एक रकमे पाच लाख रुपयेन फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत राज्यातील अशा पात्र झालेल्या  बालकांच्या नावावरती 5 लाख रुपयांचे  फिक्स डिपॉझिट करण्याकरता 15 डिसेंबर 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन. याच्यासाठी निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे. 

हे पण वाचा : Gayran Atikraman | गायरान जमीन अतिक्रमण हटवा मोहिमेस तात्पुरती स्थगिती

या योजनेच्या अंतर्गत या बालकांच्या नावे पाच लाख रुपयांचा फिक्स डिपॉझिट करण्याकरता 2 कोटी 35 लाख रुपये एवढा निधी आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांना वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे दोन महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय घेऊन  कोरोनामुळे आपले आई-वडील पालक गमावलेल्या किंवा आपले नातेवाईक गमावलेल्या नजदीकीच्या या नातेवाईकांना आता दिलासा मिळणार आहे. मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय आपण mharashtra.gov.in या संकेतस्थळावर ती पाहू शकता.

Leave a Comment